spot_img
11.5 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img

IND vs PAK: आज भारत आणि पाकिस्तान भिडणार, कधी आणि कुठे पहायचा सामना?

आजपासून श्रीलंकेतील डंबुला येथे महिला आशिया कप टी-20 क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून भारताचा पहिला सामना आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.

त्याचबरोबर आज संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ यांच्यातही सामना रंगणार आहे. आज होणारा भारत आणि पाकिस्तान सामना किती वाजता सुरु होणार आणि कुठे पाहता येणार ते जाणून घेऊयात…

भारतीय संघ गतविजेता

बांगलादेशमध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या T20 वर्ल्डकपपूर्वी होणारी ही आशिया कप स्पर्धा महत्त्वाची आहे. आशिया चषकात भारतीय संघ आज आपला पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय महिला संघाने गेल्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदाही ही स्पर्धा जिंकण्याची संधी भारताकडे आहे.

भारत-पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड

टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाचा पाकिस्तानविरुद्धचा रेकॉर्ड शानदार आहे. या फॉरमॅटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 14 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला तर पाकिस्तानला केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्याची संधी भारतीय संघाकडे आहे.

हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान सामना आज सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर हा सामना प्रसारित केला जाणार आहे. तसेच भारतीय चाहत्यांना हॉटस्टार ॲपवर या रोमांचक सामन्याचा आनंद घेता येणार आहे.

19 ते 28 जुलै दरम्यान स्पर्धा रंगणार

महिला अशिया कप ही स्पर्धा 19 ते 28 जुलै दरम्यान श्रीलंकेतील डंबुला येथे होणार आहेत. या स्पर्धात एकूण 15 सामने खेळले जाणार आहेत. तर उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 26 जुलैला होणार असून अंतिम सामना 28 जुलैला होणार आहे.

महिला आशिया कप 2024 साठी भारतीय संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील , सजना सजीवन.

महिला आशिया कप 2024 साठी पाकिस्तानचा संघ

निदा दार (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, फातिमा सना, गुल फिरोझा, इरम जावेद, मनिबा अली, नाझिहा अल्वी (विकेटकीपर), नशरा संधू, ओमामा सोहेल, सादिया इक्बाल, सिरदा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन.

ताज्या बातम्या