spot_img
12.3 C
New York
Monday, March 9, 2026

Buy now

spot_img

बायको नांदायला येईना पट्ट्यानं सासर्‍याच घरच जाळल

बीड : बीडच्या पिंपळा धायगुडा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आला आहे. यात नशेत असलेल्या जावयाने सासर्‍याच्या घरालाच पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
बीडच्या पिंपळा धायगुडा येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आला आहे. यात नशेत असलेल्या जावयाने सासर्‍याच्या घरालाच पेट्रोल टाकून आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या दारूच्या सवयीला कंटाळून मागील आठ दिवसापासून पत्नी पिंपळा धायगुडा येथे माहेरी राहत होती. यानंतर पतीने थेट सासरवाडी गाठत पत्नीला नांदायला येण्याची मागणी केली. मात्र यावर पत्नीने ’तुम्ही पिणे बंद करा, मगच मी येईल’ असे सांगितल्यावर पतीने सोबत आणलेल्या कॅनमधून घराच्या दरवाजावर आणि खिडकीतून आत पेट्रोल ओतून आग लावून दिली.
दरम्यान, या आगीमध्ये घरातील गृहपयोगी साहित्य जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेजार्‍यांनी आग विजवल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पत्नीच्या सुलोचना राहुल जगताप यांच्या फिर्यादीवरून पती राहुल दत्तोपंत जगताप याच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या