spot_img
-7 C
New York
Wednesday, January 21, 2026

Buy now

spot_img

स्वा सावरकर प्राथमिक विद्यालयात  मेळावा

बीड :  येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वा सावरकर प्राथमिक विद्यालयात पहिली ते सातवी पर्यंतच्या ओलिंपियाड, मंथन, शिष्यवृत्ती आणि इतर विविध स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पालक मेळावा आज आयोजित करण्यात आला होता. या पालक मेळाव्यासाठी एकूण 253 पालकांनी सहभाग नोंदवला आहे.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती बालिकाताई देशमुख, प्रमुख वक्ते श्री सुरेश मुसळे सर, विभाग प्रमुख श्री राजकुमार अचवले व श्रीमती रूपालीताई गुळवेलकर, सकाळ सत्रातील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्रीमती पल्लवी खंबायते, दुपार सत्रातील स्पर्धाप्रमुख श्री शरद भवर, सहप्रमुख श्री सचिन बारगजे, जेष्ठ शिक्षक श्री सचिन सानप उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रजनन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सोनाली साबळे यांनी केले. यामध्ये त्यांनी वर्षभर स्पर्धा परीक्षेसाठी शिक्षकांनी राबवलेले विविध उपक्रम, अभ्यासक्रम, सराव परीक्षा याबाबत पालकांना अवगत केले, यानंतर श्रीमती सुजाता माने, श्री राहुल देशमुख, श्री किरण मोटे, श्री शरद भवर यांनी विषयनिहाय अभ्यासक्रमाबाबत पालकांना अवगत करून, पालक म्हणून विद्यार्थ्याकडून कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे वैयक्तिक पद्य श्रीमती कीर्ती तुपकर यांनी सादर केले. या स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते श्री सुरेश मुसळे सर यांनी विविध स्पर्धा परीक्षांची पालकांना माहिती दिली. स्पर्धा परीक्षेत शालेय अभ्यासक्रमाची सुसंगत पण त्याहून थोडेसे पुढचे ज्ञान देण्यात येते. वैविध्यपूर्ण विषयांची विद्यार्थ्यांना ओळख होते. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व सर्जनशीलता विकसित होते. मोबाईल फोन स्वतःच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी द्यावा व स्वतः विद्यार्थ्यांसमोर आपण मोबाईलचा वापर कमी करावा असे त्यांनी सांगितले.
उपस्थित पालकापैकी श्रीमती पद्मा बिडकर, श्रीमती वर्षा पोकळे, श्री पांडुरंग गायकवाड, श्री नागेश मुने, श्री शिवकुमार वाळूरकर यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.
श्री शरद भवर यांनी आय एम ओ आणि ई आय ओ या स्पर्धेतील जिल्हास्तरावर निवड झालेल्या ९० विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली तसेच आगामी मंथन व स्कॉलरशिप ओलिंपियाड या स्पर्धा परीक्षा बाबत पालकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप करताना उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती बालिका ताई देशमुख यांनी शैक्षणिक वर्ष 2025-26 हे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तयारी वर्ष म्हणून राबवल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेण्यात आली असून विषयानुसार सखोल मार्गदर्शन केले आहे. नियमित सराव परीक्षा घेऊन मूल्यमापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्राथमिक ओळख करून दिली असून भविष्यातील स्पर्धा परीक्षेची भीती घालवण्यात आली आहे. शाळेचे पूर्वनियोजन, शिक्षकांची मेहनत, विद्यार्थ्यांचे परिश्रम आणि पालकांचे सहकार्य याबाबतीत त्यांनी पालकांना संबोधित केले. स्पर्धा परीक्षा सहप्रमुख श्री सचिन बारगजे यांनी मुख्याध्यापिका श्रीमती बालिकाताई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षापासून विविध वैशिष्टयपूर्ण आणि गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवले असून विद्यार्थी, पालक व शिक्षक त्यांना उत्तम प्रतिसाद देत असल्याचे सांगून सर्वांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शाळेचा नावलौकिक करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संजिवनी चाटोरीकर तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा प्रमुख श्रीमती पल्लवी खंबायते यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व वर्ग शिक्षकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचा समारोप कल्याण मंत्राने करण्यात आला.

ताज्या बातम्या