बीड : परमपूज्य श्री माताजींच्या परमकृपेत तालुक्यातील खडकी घाट येथे कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार सोहळा रविवार दि.२५ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून शनिवार दि.२४ जानेवारी २०२५ रोजी प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सहजयोगी ताई दादांनी या सोहळ्यास उपस्थित राहून परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सहजयोग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील खडकी घाट (बीडपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर) या गावात सहजयोगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार देणारा पब्लिक प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. खडकी घाट गावाची लोकसंख्या सुमारे १२ हजार असून, या परिसरात सहजयोगाचा प्रसार व्हावा या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे . या कार्यक्रमाच्या अनुषंगाने २४ तारखेला सकाळी ९ वाजता खडकी घाट गावात पत्रके वाटप आणि शाळेच्या ठिकाणी २५ जानेवारी रोजी श्री माताजी निर्मला देवी यांच्या परमकृपेत कुंडलिनी जागृती व आत्मसाक्षात्कार (पब्लिक प्रोग्राम) सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी चार वाजता बैलगाडी मधून मेगा रॅली निघणार आहे.
या कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसारासाठी तसेच आत्मसाक्षात्कार व पब्लिक प्रोग्राम यशस्वी करण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व सहजयोगीताई-दादांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बीड जिल्हा समन्वयक वैजयंता पवार ताई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क क्रमांकावर फोन करून माहिती घ्यावी, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
सहजयोगाच्या माध्यमातून समाजात शांती, संतुलन आणि आत्मसाक्षात्काराचा प्रसार व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अधिकाधिक लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पवार ताई यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बाळू शेळके (९४२२४९८२१०) या नंबर वर संपर्क करावा.

