महिला आयोगाच्या सूचना
बीड : बीड शहरातल्या नावाजलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थिनी सोबत लैंगिक चाळे केल्याप्रकरणी तेथील संचालक विजय पवार आणि त्याचा साथीदार प्रशांत खाटोकर या दोघां विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही फरार आहेत या प्रकरणाने बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आणि संतप्त भावना दिसून येत आहेत या गंभीर प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी पत्राद्वारे तात्काळ सूचना करून दोषीन विरोधात कठोर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत त्याचबरोबर तपासाचा वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही केल्या आहेत
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज एक पत्र बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीतकावत यांना दिले आहे त्या पत्रामध्ये महाराष्ट्राचे महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणतात
बीड जिल्ह्यात खाजगी क्लास मधील अल्पवयीन मुलीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आली आहेत. राज्य महिला आयोगाने पोलिसांना सदर क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेऊन आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, या क्लासमधील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन अजून अशा तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा असे निर्देश दिले आहेत. तसेच पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत असून तिचे समुपदेशन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.
अशा आशयाचा ट्विट रूपालीताई चाकणकर यांनी काही वेळापूर्वी केला आहे