spot_img
17.5 C
New York
Saturday, June 28, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये उपकार्यकारी अभियंता आंधळे,सहायक हिवाळेला लाच घेताना पकडले

बीड : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड येथे लेखी तक्रार दिली की, त्यांचे पिंपळवंडी ता. पाटोदा येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजने अंतर्गत भुमीगत नालीचे काम पुर्ण झाल्याचे अंतीम बिलाचे नोट शीटवर सही करुन वरिष्ठांकडे अंतीम बील मंजुरीसाठी पाठविण्याकरीता मुकुंद आंधळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बीड व किरणकुमार हिवाळे, वरिष्ठ सहायक ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड यांनी ३५००० रुपये व जुने कामाचे ५०००० रुपये असे एकुण ८५००० रुपये लाचेची मागणी करीत आहेत वगैरे मजकुराची तक्रार दिली
यातील तक्रारदार यांनी दिनांक २५/०६/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दि. २५/०६/२०२५ रोजी तक्रारदार व पंच क्रमांक १ यांना कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, बीड जिल्हा परिषद येथे पाठवून लाच मागणी पडताळणी केली असता मुकुंद चंद्रसेन आंधळे, वय ३३ वर्ष, व्यवसाय – नौकरी उप कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद बीड (वर्ग-१) अतिरीक्त पदभार कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड. रा. प्लॉट नंबर ०७ सारडा नगरी, बीड यांच्याकडे पिंपळवंडी ता. पाटोदा येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजने अंतर्गत भुमीगत नालीचे काम पुर्ण झाल्याचे अंतीम बिलाचे नोट शीटवर सही करुन वरिष्ठांकडे अंतीम बील मंजुरीसाठी पाठविण्याकरीता ३०००० रुपये व जुने कामाचे ५०००० रुपये असे एकुण ८०००० रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती कागदावर ८०००० रुपये असे लिहुन लाच मागणी करुन स्वतः लाचेची रक्कम किरण हिवाळे वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बीड (वर्ग-३) यांचे मार्फत लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. तसेच किरण हिवाळे यांनी स्वतःसाठी व श्री. आंधळे यांचेसाठी ८०००० रुपये ची लाच मागणी करुन लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले.
आज दि. २५/०६/२०२५ रोजी सापळा कारवाईचे आयोजन आलोसे यांचे कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद बीड चे परिसरामध्ये केले असता आलोसे क्र. २ किरण हिवाळे यांनी तक्रारदाराकडून पिंपळवंडी ता. पाटोदा येथील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजने अंतर्गत भुमीगत नालीचे काम पुर्ण झाल्याचे अंतीम बिलाचे नोट शीटवर सही करुन वरिष्ठांकडे अंतीम बील मंजुरीसाठी पाठविण्याकरीता ८०००० रुपये लाच रक्कम स्वीकारताना कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, जिल्हा परिषद बीड चे परिसरामध्ये पंच साक्षीदार समक्ष रंगेहात पकडले. त्यांचे विरुध्द आज दिनांक २५.०६.२०२५ रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर जिल्हा बीड येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे. सदरची कारवाई मा. श्री. संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, श्री. मुकुंद अघाव, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, अविनाश गवळी, अमोल खरसाडे, संतोष राठोड, प्रदिप सुरवसे, अंबादास पुरी. सर्व ला.प्र.वि. बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या