spot_img
22.9 C
New York
Saturday, June 7, 2025

Buy now

spot_img

चिंचोली माळी येथे स्वातंत्र्यसेनानी भुजबळ यांच्या स्मारकाची विटंबना

केज : तालुक्यातील चिंचोली माळी येथे स्वतःला पत्रकार म्हणून घेणार्‍या रोहन गलांडे या तरुणाने मागच्या कांही दिवसांपूर्वी स्मारकावर बसून मद्य प्राशन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सदरील प्रकारामुळे स्मारकाची विटंबना झाली असून सर्वच समाजातील नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे स्मारकाची विटंबना करून समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी २४ तासाच्या आत त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल अशा प्रकारचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदार यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे स्वातंत्र्य सेनानी बसलिंग अप्पा भुजबळ यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. स्वतंत्र सेनानी बसलिंगअप्पा भुजबळ हे हैदराबाद मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यामधले खूप मोठे नाव असून त्यांचा हैदराबाद मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात खूप मोठा वाटा होता. ते आगळगाव येथील कॅम्पचे प्रमुख होते. एवढेच नाही तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी चिंचोली माळी येथे १९५६ साली कर्मवीर शिक्षण संस्थेची स्थापना करून सर्वांना शिक्षणाचे द्वार खुले केले एवढेच नाही तर त्यांनी कायम समाज हितासाठी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एक देशभक्त आणि शैक्षणिक आधारवड म्हणून पाहिल्या जाते. आणि त्यामुळेच स्वातंत्र्यसेनानी बसलिंग अप्पा यांची प्रेरणा समाजाने घ्यावी यासाठी कर्मवीर शिक्षण संस्थेच्या आवारात त्यांचे स्मारक उभा करण्यात आलेले आहे. मात्र गावातीलच स्वतःला पत्रकार म्हणून घेणार्‍या रोहन गलांडे या तरुणाने मागच्या कांही दिवसांपूर्वी स्मारकावर बसून मद्य प्राशन केल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. सदरील प्रकारामुळे स्मारकाची विटंबना झाली असून सर्वच समाजातील नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे स्मारकाची विटंबना करून समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी २४ तासाच्या आत त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल.

ताज्या बातम्या