spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

वासनवाडीत तरूणाचा तळ्यात बुडून मृत्यू

बीड तालुक्यातील वासनवाडी फाटा येथील प्रेम सतीश क्षीरसागर (वय 14) वर्ष या आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजता वासनवाडी गावाजवळ असणार्‍या तलावात घडली आहे.
प्रेम शाळेतून घरी आल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी तळ्यावर गेला होता. चार ते पाच मुले पोहत असताना प्रेम देखील तलावात पोहण्यासाठी उतरला होता मात्र तळ्यातील गाळात अडकल्याने त्यातून बाहेर येऊ शकला नाही. त्यामुळे पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेची माहिती इतर मित्रांनी प्रेम च्या वडिलांना दिली असता वडील व गावकर्‍यांनी तळ्याकडे धाव घेतली. प्रेम ला पाण्याच्या बाहेर काढून बीड येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरानी प्रेमला मृत घोषित केले. या घटनेमुळे वासनवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या