कोल्हापूर बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून एका शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास घडली. विजय भागवत कुंडलकर (वय ३६, रा.म्हाडा कॉलनी, शहापूर. मूळ गाव खोकरमोहा, जि.बीड) असे त्या नराधमाचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विजय हा शिक्षक असून, रविवारी सुट्टीच्या दिवशी सकाळच्या सुमारास एका घरामध्ये पीडित अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचे पाहून तो पाठीमागील दरवाजाने घरात घुसला. तेथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला, तसेच याबाबत घरात सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. दरम्यान, हा प्रकार तिच्या आईला समजल्यानंतर तिने बुधवारी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत.