बीड : शहरातील गायत्रीनगर मधील मृणाल मिलिंद कुलकर्णी हिची भारतीय स्टेट बँकेमध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड १ पदी नियुक्ती झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवले आहे.
मृणालचे १० वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय गढी येथे झाले. १२ वी मध्ये चांगले गुण घेऊन तिने छत्रपती संभाजीनगर येथील गव्हरमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे कॉम्प्युटर ब्रँच मधून इंजिनिअरींग अगदी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून १ वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि हे घवघवीत यश संपादित केले. या बद्दल तिचे सर्व नातेवाईक शिक्षक, मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.