केज : संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपी दर्शन घुले याची आज दि. 14 फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपली असून त्याला सीआयडीने केज पोलीस ठाण्यातून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी सुनावली नंतर पोलीस पथक आरोपीला घेवून जिल्हा करागृहाकडे रवाना झाले आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता. केजचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सुदर्शन घुले याला दि.11 फेब्रुवारी रोजी सीआयडीचे उपअधीक्षक अनिल गुजर यांनी त्याला 12 फेब्रुवारी रोजी केज न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस व्ही पावसकर यांच्या न्यायालयात हजर केले होते. प्रथम वर्ग न्यायाधीश एस व्ही पावसकर यांनी सुदर्शन घुले याला दि. 14 फेब्रुवारी पर्यंत सीआयडी कोठडी सुनावली होती. डी आय डी कोठडीत त्याचे व्हॉईस सँपल्स घेण्यात आले असून ते पडताळणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवून दिले आहेत.त्याची आज दि. 14 फेब्रुवारी रोजी पोलीस कोठडी संपत असल्याने त्याची उपजिल्हा रुग्णालय केज येथे तपासणी करून त्याला न्यायालयात हजर केले. क स्तरीय न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश एस. व्ही. पावसकर यांनी त्याला न्यायालयीन सुनावण्यात आली आहे. या वेळी सरकारी पक्षाचे वकील ड. जितेंद्र शिंदे यांनी काम पाहिले. दरम्यान न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत आदेश होताच सीआयडी आणि पोलिसंचे पथक सुदर्शन घुले याला घेवून जिल्हा कारागृहाकडे रवाना झाले आहे.