अहिल्यानगर : निर्मला धाम आश्रम आरडगाव ,राहुरी जि.अहिल्यानगर येथे येत्या ३१ जानेवारी १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र सेमिनार व श्री एकादशरुद्र पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जास्ती जास्त साधकांनी पुजेचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रम कार्यकारिणी सभासद व परिसरातील सहजयोगीच्या वतीने करण्यात आले आहे.
परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या द्वारे १९८६ मध्ये या ,विश्वातील सहज योगाच्या प्रथम आश्रमाची स्थापना केली गेली.या सात एकर विस्तारित आश्रमात प पू श्री माताजींचे मंदीर , अत्याधुनिक पूजा सभागृह , व साधकांसाठी निवास व्यवस्था , भोजन व्यवस्था व अत्याधुनिक अशा टॉयलेट व बाथरुम्स् ची व्यवस्था आहे. द लाईफ इटर्नल् ट्रस्ट , मुंबई यांच्यातर्फे या आश्रमाचे विकास कार्य २०२१ मध्ये हाती घेण्यात आले.सात एकरातील भव्य परिसरामधे लैंड स्केपिंगनुसार आतापर्यंत २००० साधक बसू शकतील इतका भव्य सभागृह , अत्याधुनिक सुविधांनुसार टॉयलेट बाथरूमचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे.एकूण २०० साधक निवास करु शकतील अशी व्यवस्था व भोजनगृहाची सोय येथे आहे. सन् २०२२ मध्ये श्री. माताजींच्या कन्या आदरणीय श्रीमती कल्पना दिदी यांच्या शुभहस्ते भूमिपूजन होऊन २०२३ साली परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने विश्वातील सहज सर्व सहज योग्यांच्या उत्थाना करता या आश्रमाचे उद्घाटन केले गेले. विश्वातील सर्व ठिकाणाहून साधक येथे ध्यानधारणेसाठी व स्वतःचे उत्थानासाठी भेट देत असतात ,येथे निवास व ध्यान धारणा करतात. आश्रमाचे विस्तारीकरणाचे सर्व कार्य साधकांनीं दिलेल्या अर्थसहाय्याने होत असते. विकासाच्या आराखड्याप्रमाणें अजून भरपूर विस्तारीकरणाचा ट्रस्टचा प्लान आहे. दर शनिवारी संध्या. ७ वा. येथे सामूहिक ध्यान धारणेचे सत्र असते. या दैनिक ध्यानामुळे मनुष्यास आध्यात्मिक जागृति मन:शांति व आरोग्य विद्यार्थ्यांनां स्मरणशक्तिचा विकास , व्यक्तिविकास एकूणच शांति व समाधान प्राप्त होते. शेतकरी बांधवानां सहजयोगाच्या नित्य प्रैक्टिस मुळे शेतीतील उत्पन्नामधे लाक्षणिक वृद्धि आढळते. व्यसनांपासून मुक्ति मिळते. सर्व धर्म,जाति व पंथाचे लोक याचा फायदा घेऊ शकतात. सहजयोगाचे ध्यान पूर्णपणे शास्त्रोक्त आहे व येथे अंधश्रद्धेला वाव नाही.सर्व जनतेनें आश्रमास भेट देऊन प पू श्री माताजींचे उपदेशानुसार आत्मसाक्षात्कार प्राप्त करुन ध्यानाद्वारे आपले आध्यात्मिक उत्थान करुन घ्यावे असे आवाहन आश्रम कार्यकारिणी सभासद व परिसरातील सहजयोगीच्या वतीने करण्यात आले आहे.