spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

नविन नाशिक पत्रकार संघाचा बाळासाहेब घुगे यांना समाजभूषण पुरस्कार

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नविन नाशिक पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा समाजभूषण पुरस्कार दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी बाळासाहेब घुगे यांना जलसंपदा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार सौ सिमा ताई हिरे जेष्ठ साहित्यिक उत्तम राव कांबळे ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर बडगुजर सावळीराम काका तिदमे वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश शिंदे भाजपा प्रदेश प्रवक्ते आमित चव्हाण न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे नवीन नाशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद भाऊ दंडगव्हाळ राजेंद्र शेळके निशिकांत पाटील रंगनाथ दरगुडे बी के नागरे सर सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्काराला उत्तर देताना बाळासाहेब घुगे यांनी असे म्हटले कि मला जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानले व येथुन पुढे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दिव्यांग बांधवांची सेवा करीत राहिल मि जे काही दिव्यांग बांधवां साठी काम केले आहे त्यांचे आज खरे सार्थक झाले असे वाटले या पुरस्काराने मला ऊर्जा मिळाली आणखीन जोमाने दिव्यांग बांधवांची सेवा करत राहील.

ताज्या बातम्या