अहिल्यानगर | प्रतिनिधी
जय श्री माताजी
श्री माताजी यांच्या परमकृपे दिनांक २६ जानेवारी २०२५ लोणी जिल्हा अहिल्यानगर या शहरांमध्ये नवीन साधकांसाठी आत्मसाक्षात्कारचां कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटनासाठी लोणी शहरातील सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अहिल्यानगर माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील मा नंदू शेट रहाटी ट्रक सोसायटी चर्मण डॉक्टर एन एस मस्के लोणी गावच्या सरपंच ताई मेडिकल कॉलेजचे डीन प्राध्यापक नितीनदादा पवार श्री बुगदे साहेब ट्रस्टी आरडगाव आश्रम श्री प्रदीप सोळसकर मुंबई श्री वसंत काळे नाशिक डॉक्टर जावळे साहेब नाशिक श्री सरगर साहेब नवी मुंबई श्री बसवराज बिराजदार लातूर श्री केके आव्हाड श्रीरामपूर श्री श्रीनिवास बोज्जा अहिल्यानगर श्री सुमित आहेर नाशिक त्याचबरोबर स्टेज वरती भजन दिल्ली मधून श्री मुखीरामजी त्यांची टीम त्यांच्यासोबत श्री अरविंदजी पवार व बासरी वादक श्री कुलकर्णी श्रीरामपूर ढोलकी वर .राज पाटील अकोला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री अशोकराव तर कसे शिर्डी र्ीं श्री विखे पाटील सर प्रस्तावना माननीय श्री कोकरे साहेब श्रीरामपूर व या कार्यक्रमाचे सहज योगाचे सखोल मार्गदर्शन प्राध्यापक श्री नितीन दादा पवार श्रीरामपूर यांनी केले हा संपूर्ण कार्यक्रम लोणी शहरांमध्ये प्रचार आणि प्रसार तीन दिवसाचा चालला यामध्ये परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांची भव्य अशी रॅली ढोल ताशांच्या गजरात निघाली या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाशीची राणी श्री माताजी पालखी महालक्ष्मी महाकाली महा सरस्वती भारत माता श्री गणेश हनुमानजी श्रीराम लक्ष्मण सीता श्री राधाकृष्ण मावळे अगस्ती ऋषी असे अनेक पात्र त्याच त्याच बरोबर डोक्यावरती महिलांनी कलश असे सर्व फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये श्री माताजींचे स्वागत करत ही रॅली संबंध लोणी गावातून मार्ग पूर्ण करून अहिल्याबाई होळकर शाळेच्या प्राणांना मध्ये या रॅलीचे स्वरूप बदलून असंख्य नवीन साधकांना आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्रदान करण्याचा हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला.
या रॅलीचे व प्रोग्राम चे नियोजन श्री ज्ञानेश्वर भगत श्री अमोल यावलकर श्री अमोल अभंग श्री सुमित आहेर श्री घुमटकर नाना श्रीरामपूर श्री बनवटे आप्पा ,श्री विखे पाटील सर ,श्री आमले सर, श्री राहणे काका श्री भुसाळ सर ,श्री डांगे सर , श्री अभिजीत गुरव ,श्री प्रफुल मंडळकर ,श्री मनोज माने ,चैतन्य अभंग , चैतन्य भांगे, श्री मनोज वाघंचौरेअसे असंख्य युवाशक्ती यांनी केले सर्व नियोजन स्थानिक मधील सहज योगी बंधू-भगिनी यांनी केले.
यावेळेस सबंध महाराष्ट्रातून सोलापूर नाशिक मुंबई ठाणे पुणे सातारा अकोला लातूर धुळे नवी मुंबई अहिल्यानगर सांगली बीड परभणी धाराशिव अशा असंख्य जिल्ह्यातून सहजोगीताई दादा आले होते या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सहज योग प्रचार प्रसार टीम महाराष्ट्र यांनी केले.
थँक्यू श्री माताजी