spot_img
25.9 C
New York
Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

खळबळ ! केजमध्ये आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह

केज : केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबमधील मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज – अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या