spot_img
2 C
New York
Monday, January 13, 2025

Buy now

spot_img

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींना लावला मोक्का

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उखऊ कडून कारवाईला जोर आला असून सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणार्‍या असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, याप्रकरणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सर्व दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितलंय.
सध्या मोक्का अंतर्गत कोर्ट प्रक्रिया सुरू असून आरोपी विषणूचाटे एक दिवस आधी आरोपीला भेटल्याचं सांगण्यात येत आहे. विष्णूचाटेची मोक्काअंतर्गत चौकशी करायची आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा कट आरोपी आणि विष्णूचाटेने केला असा आरोप केला जात आहे.


सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर दहा वर्षात दहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात घुलेवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. केज पोलीस ठाण्यात एकूण आठ गुन्हे असून मारहाणीचे चार, चोरीचा एक, अपहरणाचा एक तर 2019 मध्ये खंडणीचा एक गुन्हा आहे. अंबाजोगाई शहरात फूस लावून पळवण्याचा गुन्हा नोंद आहे.महेश सखाराम केदार याच्यावर धारूर पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे असून त्यात मारामारी, चोरी दुखापत करणे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न करणे, असे गुन्हे आहेत. त्याबरोबरच सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.जयराम माणिक चाटे हा 21 वर्षाचा असून त्याच्यावर 2022 ते 24 या तीन वर्षात तीन गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एक गुन्हा, केज पोलीस ठाण्यात दुखापतीचा एक गुन्हा, तर सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
प्रतीक भीमराव घुले हा 24 वर्षाचा तरुण असून त्याच्यावर 2017 ते 24 या आठ वर्षांमध्ये केज पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात मारहाण करणे, दुखापत करणे, गर्दी मारामारीत सहभाग आणि संतोष देशमुख यांच्या खुनात सहभाग असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा शामराव आंधळे हा अद्याप फरार असून 2020 ते 24 या चार वर्षात एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. धारूर पोलीस ठाण्यात गर्दी जमवणे, मारामारीचे तीन गुन्हे तर 2023 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. शिवाय अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात 2023 मध्ये खंडणीचा एक गुन्हा तर केज ठाण्यात 2024 मध्ये संतोष देशमुख यांच्या खुनात आरोपी असून तो सध्या फरार आहे.तर सुधीर सांगळे हा देशमुख हत्या प्रकरणात खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असून त्याच्यावर देखील गुन्हा दाखल आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

ताज्या बातम्या