spot_img
19.5 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

सिन्नर बसस्थानकावर हाणामार्‍या करणार्‍यांवर गुन्हा दाखल

सिन्नर पोलिसांची कारवाई
ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
पोलीस अक्षीक्षक श्री. विक्रम देशमाने सो., यांनी नाशिक जिल्ह्यात शांतता नांदावी याकरीता जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अशांतता निर्माण करणार्‍यावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर प्रभावी कारवाई करणेबाबत आदेश होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांनी सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदारांना सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत अशांतता निर्माण करणार्‍यांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
दि.०९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी सिन्नर बसस्थानकाववर वाद झालेबबत पोलीस स्टेशनला माहीती प्राप्त झाल्यावर लागलीच सिन्नर पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार सिन्नर शहर व परीसरात दिवसभरात कोणतेही मालाविरुध्दचे किंवा शरीराविरुध्दचे गुन्हे घड्डु नयेत याकरीता बिट मार्शल नेमण्यात येतात सिन्नर बस्थानक परीसरात वादावादी मारामारी करणारे दोन युवक पोलिसांचे समक्ष मिळुन आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेवर पोलिस ठाण्यात गु.र.नं.१८/२०२५भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १९४ (२) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा मानकर करित असुन तपासकामी पोशि सुशिल साळवे पोशि मतिन शेख यांनी गुन्हयाचे तपासकामी मदत केली आहे.
बसस्थानक किंवा कोणत्याही सार्वजनिक शांतता राखणे प्रत्येकाचे कर्तव्य असुन अशा ठीकाणी वादावादी करुन स्वताचे वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रवृत्ती दिसुन येतात त्यावर वचक बसावा या अनुषंगाने अशा स्वरुपाच्या कारवाया नियमित करण्यात येणार आहे तरी शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक ठिकाणी तसेच आपल्या परीसरात अशा प्रकारचे गुंड हे सार्वजनिक शांततेचा भंग करुन दहशत निर्माण करत असेल तर त्याबाबत आपण तात्काळ पोलिसांना माहीती कळवावी माहीती देणार्‍याची गोपणीयता ठेवण्यात येईल. सदरची यशस्वी कामगीरी ही श्री. संभाजी गायकवाड सो., सिन्नर पोलीस ठाणे, यांचे नेतृत्वात पोहवा मनिष मानकर, पोशि. सुशील साळवे, पोशि. मतीन शेख या पथकाने केलेली आहे.

ताज्या बातम्या