केज : केज येथे घरगुती प्लॉटिंगच्या वादातून पेशाने वकील असलेल्या एका भावाने चक्क त्याच्या सख्ख्या भावाकडे २० लाखांची खंडणी मागिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर खंडणी न दिल्यास प्लॉटिंगच्या व्यवहार होऊ देणार नाही, अशीही धमकी देत प्लॉटच्या भोवती केलेले वॉल कंपाऊंड पाडून सुमारे २.५ लाख रुपयांचे नुकसान केले.
याबाबतची अधिक माहिती अशी की, केज येथील जुनेद शाकीर शेख यांची केज येथील जुन्या दूध डेअरीजवळ प्लॉट आहे. या प्लॉटला त्यांनी सिमेंटचे खांब उभे करून सिमेंटच्या प्लेट्स लावून वॉल कंपाऊंड बांधलेली आहे. त्यांचा मोठा भाऊ सईद शाकेर शेख याने त्यांना यापूर्वी फोनवर व नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्लॉटींग मधील १० टक्के जमीन दे. किंवा २० लाख दे. अशी मागणी केली होती. तसेच तू जर पैसे दिले नाही. तर प्लॉटींगमधील प्लॉटची विक्री करू देणार नाही. कंपाऊंड वॉल पाडून टाकणार, अशी धमकी दिली होती.
केज येथील साथीदाराने कंपाऊंड वॉलमध्ये दि. २९ डिसेंबररोजी रात्री १० नंतर ते दि. ३० डिसेंबररोजी सकाळी ९. ३० या दरम्यान कंपाऊंड वॉलची नासधूस करून ५०० फूट लांबीचे कंपाऊंड वॉलची अंदाजे २ ते २.५ लाखांचे नुकसान केले आहे. सोमवारी (दि. ३०) जुनेद शेख यांनी केज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मित्र मुस्तकीन जब्बार शेख असे दोघे जण प्लॉटवर गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या प्लॉटींगला केलेले सिमेंट कंपाऊंड वॉल पाडलेले दिसली.
या प्रकरणी जुनेद शेख यांनी त्यांचा मोठा भाऊ सईद शाकेर शेख (रा. मुजफ्फरनगर हरसूल जेल रोड एन. १३ छ्त्रपती संभाजीनगर), जावेद शाह (रा. जुना मोंढा, छ्त्रपती संभाजीनगर), ईरफान मुरतुजा शेख (रा. मुजफ्फरनगर हरसूल जेल रोड एन. १३ छत्रपती संभाजीनगर) व त्यांचे केज येथील इतर साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी पुढील तपास करीत आहेत.