spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

संतोष देशमुख खूनातील आरोपीच्या गर्लफ्रेंडचा नाशिकमध्ये फ्लॅट

अजितदादांनी बीडचं पालकमंत्रीपद घ्यावे-खा.सोनवणे
बीड : सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देवू नये. संतोष देशमुख सारख्या सोज्वळ मुलाच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्या मारेकर्याला फाशीची शिक्षा द्या, हीच माझ्यासह, माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजित दादा यांच्या राष्ट्रवादी गटाचे जिल्ह्यात तीन आमदार आहेत. त्यामुळे अजित दादांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे (इरक्षीरपस डेपरुरपश) यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी ही मागणी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर त्यांच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेतला खरा मास्टरमाईंड कोण आहे, त्याला देखील समोर आणलं पाहिजे. तीन आरोपी अद्याप फरार आहे. सर्वात आधी मी याबाबत माहिती मीडियाला दिली आहे. संतोष देशमुख यांच्या अंगावर ५६ जखमा आहेत. त्यांनी असा काय गुन्हा केला होता की त्याला एवढे मारले. एस पी साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाही. ९ तारखेला सरपंचाच्या भावाला कोण कोण बोलले. पीआय ला कुणाचे फोन आले हे सगळे सी डी आर मध्ये आहे ते काढा.सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात विष्णू चाटे सरेंडर झाले की त्यांना अटक झाली? १५ दिवस झाले मग तीन आरोपी आणखी अटक का नाही? खंडणीची केस, ऍट्रॉसिटीचाची केस पण सीआयडी कडे वर्ग केली आहे. याचा अर्थ या सगळ्या प्रकरणात एकच आरोपी आहेत. सहा दिवसात या प्रकरणात प्रगती झाली नाही. केवळ एसपीची बदली केली. जे गोपीनाथ मुंडे यांनी केलं तेच देवेंद्र फडणवीस यांनी करावे, अशी मागणीही खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
सहा तारखेला कोणी फोन केला, त्याचं कॉल डिटेल्स काढा. जो चौथा आरोपी आहे त्याचा सीडीआर काढा मग सर्व मिळेल. नाशिक मध्ये गर्लफ्रेंडला फ्लॅट दिले हे तपास करा. यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा, आयकर किती भरला हे तपासा आणि प्रशासन यात जबाबदार आहे. जे आरोपी आहेत त्यांचा उऊठ काढा. आपली पोलीस यंत्रणा त्या बाबतीत तत्पर आहे, यातील मास्टर माईंड शोधला पाहिजे हीच माझी मागणी आहे.पोलीस अधीक्षकांकडे मागणी आहे की यातील दोषी पोलिसांचा उऊठ काढा, कायदा सुव्यवस्थे प्रस्थापित करा. जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्या करा. परळीतील डॉक्टरला विनाकारण गोवले गेले. असल्याचा आरोपही बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या