spot_img
26.6 C
New York
Friday, July 4, 2025

Buy now

spot_img

एकनाथ शिंदेंचा गृह खात्यासाठी आग्रह.

संजय शिरसाट स्पष्टच बोलले
पुणे : राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. पण अद्याप सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. तथापि, गृह खाते कोणाकडे? यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट (डरपक्षरू डहळीीरीं) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेले तर गृह खाते आमच्याकडे पाहिजे हा आग्रह असल्याचे शिरसाट यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी दरे गावी जातात; तेव्हा ते मोठा निर्णय घेतात, असेही शिरसाट यांनी सांगितले. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? याचे उत्तर कोणालाच सापडले नाही. नेमकी नाराजी आहे का? यावर चर्चा केली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की, सरकार बनवायला मी कोणताही अडसर आणणार नाही. दिल्लीत सुद्धा त्यांनी हेच सांगितले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आता निर्णय घ्यावा. पीएम मोदी, अमित शहा यांच्या निर्णयाला का वेळ लागतोय? हे आम्हाला माहीत नाही, असे शिरसाट म्हणाले.

ताज्या बातम्या