spot_img
7.2 C
New York
Thursday, December 18, 2025

Buy now

spot_img

पाच दिवसात वाढणार अजून थंडी

पुणे : उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, सातत्यानं तिथून वाहणार्‍या शीतलहरींनी महाराष्ट्रापर्यंत तापमानात घट आणल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकून असणार्‍या थंडीनं आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हातपाय पसरल्यामुळं अर्ध्याहून अधिक राज्य गारठल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड आणि धुळ्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा १०.५ अंशांवर पोहोचलेला आकडा सर्वांचीच दातखिळी बसवताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार जवळपास राज्यातील १७ जिल्ह्यांमधील तापमान १५ अंशांवरपोहोचलं असून, पुढील ४८ तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरील क्षेत्रामध्येही थंडीचा कडाका वाढणार असून, पहाटेच्या वेळी इथं दाट धुक्याच्या चादरीमुळं दृश्यमानतेवरही परिणाम होताना दिसणार आहे.
प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. मुंबईसुद्धा इथं अपवाद ठरणार नसून, शहरातील तापमानाचा आकडा १८ अंशांवर आल्यानं मुंबईतसुद्धा हिवाळ्याची खर्‍या अर्थानं सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.

ताज्या बातम्या