spot_img
20.1 C
New York
Saturday, July 5, 2025

Buy now

spot_img

महायुतीची बैठक रद्द, शिंदे सातार्‍याला जाणार

सातारा : महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन घडामोडींना वेग आला आहे. काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीमधील नेत्यांची बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत सरकार स्थापने संदर्भात शाह यांनी सूचना दिल्या. यानंतर आता आज मुंबईत महायुतीची बैठक होणार होती. पण, अचानक ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपला राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हवे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीत एकजूट असल्याचा मेसेज देण्यासाठी भाजपकडून हा आग्रह केला जात आहे.टाइम्स ऑफ इंडियाने राजकीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीनंतरही मुख्यमंत्री कोण आणि सत्तेच्या वाटाघाटीचा तिढा सुटलेला नाही.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.

ताज्या बातम्या