spot_img
16.2 C
New York
Friday, October 31, 2025

Buy now

spot_img

दिल्लीत ’ईडी’च्या पथकावर हल्ला

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सायबर गुन्ह्याशी संबंधित छापा टाकताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे, असे वृत्त ANI ने दिले आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकावर हल्ला झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. सायबर गुन्ह्याशी संबंधित छापा टाकताना हा धक्कादायक प्रकार घडला. दिल्लीतील बिजवासन भागात घडलेल्या या घटनेबाबत तपास यंत्रणेने पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. हा तपास झझझधङ सायबर प फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणातील कथित आरोपींमध्ये अशोक शर्मा आणि त्याच्या भावाचा समावेश आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने आज देशभर कार्यरत असलेल्या एका मोठ्या सायबर क्राइम नेटवर्कशी जोडलेल्या टॉप चार्टर्ड अकाउंटंट प्रकरणी व्यापक शोध मोहित सुरु केली आहे. यामध्ये फिशिंग घोटाळे, क्यूआर कोड फसवणूक आणि अर्धवेळ नोकरी घोटाळ्यांसह हजारो सायबर गुन्ह्यांमधून व्युत्पन्न केलेल्या बेकायदेशीर निधीच्या लॉंड्रिंग समावेश असून, या कारवाई अंतर्गतच दिल्लीत छापे टाकण्यात आले.

ताज्या बातम्या