spot_img
12.9 C
New York
Tuesday, October 14, 2025

Buy now

spot_img

अरे थोडक्यात वाचलास…अजितदादा-रोहीत पवार समोर येताच!

अरे ढाण्या थोडक्यात वाचला, मी सभा घेतली असती तर तुझं काय झालं असतं? असा मिश्कील टोला राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतण्या आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना लगावला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाला चांगले यश मिळाले. विधानसभा निकालानंतर आज पहिल्यांदाच कराड येथील प्रितीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली. अजित पवार समोर येताच रोहित पवार यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. यावेळी अजित पवार म्हणाले की, अभिनंदन…, बच गया… दर्शन घे दर्शन काकाचं… अरे ढाण्या थोडक्यात वाचला.

ताज्या बातम्या