spot_img
24.3 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

संजय शिरसाट यांच्या मुलाच्या वाहनावर हल्ला

छत्रपती संभाजीनगर – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या वाहनावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झाला त्यावेळी संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट कारमध्ये होते. वाहनाच्या मागील बाजूने हा हल्ला करण्यात आला असून दगडफेकीमुळे कारची काच फुटली आहे. हल्ल्यानंतर अज्ञातांनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचं काम करतायेत असा आरोप केला.

या हल्ल्यानंतर संजय शिरसाट म्हणाले की, मी आतापर्यंत ३ निवडणूक लढली पण असा प्रकार पाहिला नाही. हा दगड एवढा मोठा होता की दुर्दैवाने काहीही घडू शकलं असते. मी ८ दिवसांपूर्वी पोलिसांना सूचित केले होते. काही लोक नगर, पुणे आणि नाशिकमधून या शहरात आलेत. २ ब्लॅक स्कोर्पिओ विनानंबर प्लेट शहरात फिरतायेत. माझ्या पत्नीच्या वाहनाचा पाठलाग काही दिवसांपूर्वी झाला होता. कार्यकर्त्यांना ओव्हरटेक करून गाड्या जात होत्या. निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्याने अशाप्रकारच्या घटना घडवल्या जात आहे. लोकांनी मतदानाला येऊ नये, मतदान करू नये यासाठी हे सुरू आहे. जर असे काही घडणार असेल तर आम्हाला त्याचा बंदोबस्त करावा लागेल असं त्यांनी म्हटलं.

तसेच गुंडांची फौज इथं राजू शिंदे यांनी आणली आहे. मतदारसंघात दहशत निर्माण करून जनतेचे राजे होऊ असं त्यांना वाटते. दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे. मतदार घाबरतील असं त्यांना वाटत आहे परंतु जनता यांची दहशत मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या