बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुशंगाने यूसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीत कळंब- अंबाजोगाई रोडवर आंतरजिल्हा स्थिर सर्व्हेक्षण पथक नेमून महामार्गावरील वाहनांची तपासणी करण्यात येत असून सदर ठिकाणी महसूल व पोलीस विभागांचे संयुक्त पथक २४ तास कार्यरत आहे. याच दरम्यान, या महामार्गावर जवळपास १०,३५,५२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवार दि. २८/१०/२०२४ रोजी दुपारी १५.२० वा. चे सुमारास वाहन तपासणी करत असताना पथकास कृष्णा तुकाराम कोल्हे व बळीराम त्रिंबक कोल्हे दोघे रा. नायगाव, ता. केज, जि. बीड हे दोघेजण स्कॉर्पिओं वाहन क्र एम एच ४४ झेड १५६३ मधून अवैध दारू वाहतूक करत असताना मिळून आले. सदर वाहनात एकुण ३५,५२०/- रूपयांची विदेशी दारूचे व बिअरचे एकुण ०५ बॉक्स मिळून आलेले असून सदरबाबत युसूफ वडगाव पोलीस ठाणे येथे मद्यनिषेध कायदयान्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला असून सदर गुन्हयात स्कॉर्पिओ वाहनासह एकूण १०,३५,५२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कामगिरी स्थिर सक्षण पथकातील पोहवा १४८३ सत्यपाल कांबळे, पोशि/९१६ अविनाश मोकाशे, पोशि १९१४ पठाण, श्री एम. पी. बोधीकर, श्री आर के. हारे, श्री यु. ए. माळी यानी केली.