spot_img
8.8 C
New York
Friday, March 14, 2025

Buy now

spot_img

शरद पवारांचा रमेश आडसकरांनाच हाबाडा;मोहन जगताप मैदानात

बीड : बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस बदलत असून अचानक काय होईल हे सांगता येत नाही.दोन दिवसांपूर्वी रमेश आडसकरांना उमेदवारी जाहीर होईल असा अंदाज होता. मात्र आज अचानक राष्ट्रवादीने मोहन जगताप यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे प्रकाश सोळंके आणि मोहन जगताप यांच्यामध्ये खरी लढत होणार आहे. परळी मतदारसंघातून मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माजलगाव मतदारसंघातून मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवारांनी या माध्यमातून रमेश आडसकर यांना हाबाडा दिला आहे तर परळीत मराठा कार्ड खेळले गेले आहे.
परळी मतदारसंघातून शरद पवार कोणाला उतरविणार याची उत्सुकता होती, ती आता पवारांनी संपविली असून येथून राजेसाहेब देशमुख यांना मैदानात उतरविण्यात आले आहे. माजलगावात प्रकाश सोळंकेंचा सामना आता शरद पवारांचे उमेदवार म्हणून मोहन जगताप करणार आहेत.

ताज्या बातम्या