बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
बीड : एक मोटारसायकल चोर चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्याला चार मोटारसायकल पकडण्यात आले.
बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले असता उस्मान शेख, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी प्रकरणाची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा,बीड येथील पोलीस हवालदार भागवत शेलार यांना गुप्त बातमी मिळाली की, एक इसम अथर्व सोनवणे याचेकडे चोरुन आणलेली मोटार सायकल असुन तो विकण्याच्या तयारीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळताच पो.नि. उस्मान शेख यांनी मार्गदर्शन करुन स्थागुशा पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पोह भागवत शेलार व स्टाफ यांनी संशयीत इसम नामे अथर्व हरिश्चंद्र सोनवणे रा.गिरामनगर बीड याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे जवळ असलेल्या मोटार सायकल बाबत विचारपुस केली असता त्याने माजलगाव येथुन मोटार सायकल चोरी केल्याचे सांगितले. आरोपीजवळ दोन होंडा शाईन, एक युनीकॉर्न व एक पॅशन प्रो असे एकुण चार मोटार सायकल मिळुन आल्या असुन वाहनाचे अभिलेख पडताळणी केल्यानंतर १) पो.स्टे.माजलगाव ग्रामीण गुरनं १३७/२०२४ कलम ३७९ भादंवि मधील होंडा शाईन २) माजलगाव शहर २३०/२०२१ कलम ३७९ भादंवि मधील होंडा शाईन असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. इतर दोन युनीकॉर्न व पॅशन प्रो चे वाहनाचा मालकाचा शोध चालु आहे. एकुण १,४०,०००/- रु चा मोटार सायकल मुद्देमाल स्थागुशा पथकाने जप्त केला आहे.
सदर आरोपीकडुन इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असुन आरोपी व चार मोटार सायकलचा मुद्देमाल पो.स्टे.माजलगाव ग्रामीण पोलीसांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास माजलगाव ग्रामीण पो.स्टे.व स्थागुशा बीड करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बीड .. अविनाश बारगाळ ,सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड , श्. उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली भागवत शेलार, युनुस बागवान, देविदास जमदाडे, नारायण कोरडे यांनी केलेली आहे.