spot_img
1.4 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

अखेर आडसकरांनी भाजपाला हबाडा दिलाच

तुतारी फुंकली;माजलगावातून निवडणूक रिंगणात
धारूर : माजलगाव मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवार घोषित झाल्यानंतर शरद पवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. आज ही प्रतिक्षा संपली असून भाजप नेते रमेशराव आडसकर यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला. यामुळे आता माजलगावमधून निवडणूक रिंगणात रमेशराव आडसकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
रमेशराव आडसकर यांची भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख आहे. येणार्‍या दिवसात या महायुतीमुळे जिल्ह्यातील भाजप संपेल अशी भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवारांकडून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु होती. माजलगाव मतदारसंघासाठी भाजपाचे मोहन जगताप व रमेश आडसकर यांचे नाव अनेक दिवसांपासून चर्चेत होते. विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी देवून अजित पवारांनी तगडे आवाहन उभे केले. यामुळे आता तुतारी कोण वाजविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
शुक्रवारी (दि.२५) रमेशराव आडसकर यांनी मुंबई येथे शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. रमेशराव आडसकर यांनी २०१९ मध्ये भाजपाकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात ते अल्पमतांनी पराभुत झाले होते. आडसकरांची ओळख माजी मंत्री आ. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक म्हणून होती. आडसकर आता माजलगाव मतदारसंघात तुतारीचे अधिकृत उमेदवार असणार असल्याचे सांगितले जात आहे. रमेशराव आडसकरांनी गेली पाच वर्ष मतदारसंघात संपर्क ठेवल्यामुळे आता माजलगाव मतदारसंघात निवडणूकीची रंगत वाढणार आहे.

ताज्या बातम्या