बीड : सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले असून आज बीड शहर पोलिसांनी पाच लाख रूपयांची रोकड जप्त केली असल्याची माहिती समोर येत आहे.
बीड-शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या टीमने 5 लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे.थोडयावेळापूर्वी ही कारवाई करण्यात आल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठया प्रमाणावर पैशांचा काळबाजार सुरु असतो. त्यामुळे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चेक पोस्ट लावले आहेत. याशिवाय शहरात ठिकठिकाणी वाहनाच्या झाडाझडती सुरु असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाकडून 5 लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. सदर इसम सोन्याचा व्यापारी असल्याचे सांगत असून पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ पुढील तपास करीत आहेत.