spot_img
23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

बीडमध्ये कॅफेशॉपमध्ये अश्‍लील चाळे;जोडपी पकडली

बीड  : शहरातील कॅनाल रोडवरील स्टार बर्ड कॅफेमध्ये पोलिसांनी शुक्रवारी (दि.18) अचानक छापा मारला. यावेळी अश्‍लिल चाळे करत बसलेली काही जोडपी आढळून आली. पोलिसांनी समज देवून त्यांना सोडले.
या ठिकाणी मुलामुलींना बसण्यासाठी 10 बाय 10 रुंदीचे कंपार्टमेंट प्लायवुडने वेगवेगळे करुन त्यामध्ये खुर्ची व टेबल ठेवलेले दिसून आले. कंपार्टमेंटमध्ये मंद उजेड करण्यात आलेला होता. कारवाईत कॅफेचा चालक-मालक राहुल मसुनाथ गावडे (वय 23, रा. ह.मु. राधाकृष्ण नगरी, बीड रा. नवगण राजुरी ता. बीड) याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 129, 131 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.या कारवाईत उपनिरीक्षक अमोल शिंगणे, पोउपनि निमोणे, पोह. आघाव, पो.शि. सारणीकर, मपोह म्हस्के यांचा सहभाग होता. पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती शिवाजीनगर ठाणे निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली.

ताज्या बातम्या