spot_img
16.2 C
New York
Sunday, August 31, 2025

Buy now

spot_img

शिंदे एमआयडीसी येथील श्री स्वामी समर्थ फटाके कंपनीला आग

ज्ञानेश्‍वर काकड | नाशिक
नाशिक-पुणे रोडवरील शिंदे गाव येथील एमआयडीसी मध्ये फटका गोदामाला भीषण आग लागली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. फटाक्याचा माल असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे. धुराचे लोट परिसरात पसरले आहेत.
नाशिकरोड शिंदे गाव शिवरात नायगाव रोडवर असलेल्या श्री स्वामी समर्थ ट्रेडर्स नावाच्या फटाक्याच्या गुदामाला ही आग लागली आहे. दरम्यान अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचा मुलगा गौरव विसपुते यांच्या मालकीच्या शिंदे गाव नायगाव रोड येथे श्री स्वामी समर्थ नावाचे फटाक्यांचे गोदाम आहे. आज मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आकाशात धूर दिसू लागल्याने व फटाक्यांच्या आवाजामुळे रहिवाशांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर सदर घटनेची माहिती तात्काळ नाशिकरोड अग्निशामक केंद्र व नाशिकरोड पोलिसांना देण्यात आली. यानंतर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

ताज्या बातम्या