सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांचे पो.नि.पाटील यांना निवेदन
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
सिन्नर ते निफाड राज्यमार्ग २७ वरील स्पीड ब्रेकर वरती सफेद रंगाचे पट्टे मारणे बाबत या विषयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय रामचंद्र गोसावी यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशन यांना दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की सिन्नर निफाड राज्य मार्ग क्रमांक २७ वरती कानडीमळा सिन्नर, बारगाव पिंपरी, निमगाव, के. पा. नगर, माळसाकोरे, व निफाड अशा विविध ठिकाणी रस्त्यावरती स्पीड ब्रेकर गेल्या काही वर्षापासून टाकलेले असून त्या स्पीड ब्रेकर वरती सफेद रंगाचे पट्टे न मारल्यामुळे बहुतांश ठिकाणी वाहनांचे अपघात होऊन त्या मधले काही व्यक्तींना अपंगत्व आले व काही ठिकाणी जीवितहानी झालेली आहे.
सिन्नर निफाड रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारच्या वाहनांची येण्या जाण्याची वरदळ मोठ्या प्रमाणात आहे. वाहनधारकांना रात्रीच्या वेळेस वाहने वेगात असल्यामुळे स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे छोटे-मोठे अपघात उद्भवतात.सदर विषयाचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकार्यांना दिले असून या वरती कोणतेही प्रकारची दखल घेतलेली नाही. तरी आपण आपले स्तरावर संबंधित अधिकार्यांना माहिती देऊन लवकरात लवकर स्पीड ब्रेकर ला सफेद रंगाचे पट्टे मारण्यात यावे अशा विषयांचे निवेदन देण्यात आले. तसेच सिन्नर एमआयडीसी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रमोद पाटील साहेब यांना फेटा, शाल, पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी समाधान उगले, विशाल ढेंगळे, दत्ता जोशी,सागर गोसावी, शुभम उगले इत्यादी उपस्थित होते.