spot_img
-0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

आईच्या शरीराला बांधलेले सापडले चिमुकल्यांचे मृतदेह

गावकर्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण
बुलढाणा: जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात एका पाझर तलावात आई आणि दोन चिमुकल्यांचे मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी गावाजवळ असलेल्या तलावात सोमवारी हे तीन मृतदेह सापडले आहेत. त्यामुळे खामगावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येत या तिन्ही मृतदेहांचा पंचनामा करुन ते ताब्यात घेतले.
काही गावकर्‍यांना तलावातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा गावकर्‍यांनी तलावापाशी जाऊन पाहिले असता पाण्यावर एका महिलेसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह तरंगताना आढळून आले. ही माहिती गावात पसरताच अनेक लोक तलावापाशी जमले होते.
प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही मृतदेह बर्‍याचप्रमाणात कुजले आहेत. आईने आपल्या दोन चिमुकल्यांना स्वःतच्या शरीराला बांधलेल्या अवस्थेत पाझर तलावात हे मृतदेह सापडले होते. या मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. पार्वती प्रकाश इंगळे (वय ३०), आर्यन प्रकाश इंगळे (वय ८) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. या महिलेच्या कंबरेला दोन्ही मुले बांधलेले असल्याचे समोर आले आहे . काही दिवसांपासून ही महिला आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. मात्र, तिने आत्महत्या का केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत .
याच तलावात गेल्या आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. यामुळे पिंपरी गवळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून त्यांच्याकडून सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत. सध्या पोलिसांच्या मते ही आत्महत्याच असल्याचा दिसत असले तरी तरीही वेगवेगळ्या दृष्टीने पोलिस तपास करणार आहेत.

ताज्या बातम्या