spot_img
23.5 C
New York
Sunday, July 13, 2025

Buy now

spot_img

गावंदरामध्ये टिप्परच्या धडकेत शेतकरी ठार

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको 
किल्लेधारुर : खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर धारूर तालुक्यातील गांवदरा येथे भरधाव टिप्परने धडक दिल्याने रामा सिताराम घुले (वय 48) हे जागीच ठार झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. सततच्या अपघातामुळे टिप्पर चालकांच्या बेभान वर्तनामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.
धारुर तालुक्यातील गांवदरा ऊसतोड कामगार रामा सिताराम घुले (वय 48) यांना भरधाव टिप्पर (क्र. एमएच 21 बीएच 1600) याने आज दि.26 सोमवार रोजी सकाळी दहाच्या सुमारास जोराची धडक दिली. सदर अपघात खामगाव-पंढरपुर या राष्ट्रीय महामार्गावर घडला. या भीषण अपघातात रामा घुले यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी बस स्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम केला. घटनेची माहिती मिळताच तहसील व पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गावर भरधाव टिप्परमुळे अनेक अपघात होत असुन बिनधास्त वाहन चालवणार्‍या टिप्पर चालकांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाकडून दखल घेण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. यावेळी भाजपाचे युवानेते बाबरी मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली.

ताज्या बातम्या