spot_img
19.7 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

जिजामाता प्रा.विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात

बीड : येथील औद्योगिक वसाहत येथे असलेल्या अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळ, चिंचाळा ता.वडवणी संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचा ध्वजारोहन संस्थेचे संचालक नवनाथराव मोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.आर.ढोरमारे सर हे होते. तर कार्यक्रमाला बहिरवाडीचे सरपंच जितेंद्र बोबडे, उपसरपंच खंडू डोईफोडे, ग्रामसेवक समाधान शेलार, ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटोळे, ग्रामसेवक सपकाळ, निर्मळ देवा, शंकर वाघमारे, रामेश्वर राऊत, वैष्णवताई तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेत वेषभूषा स्पर्धा, देशभक्तीपर गीते आणि नृत्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दरे मॅडम यांनी केले. तर आभार देशमुख सरांनी मानले.
कार्यक्रमासाठी आखाडे सर, विकास मोटे सर, श्रीमती कुलकर्णी मॅडम,रेगुडे मॅडम, शिंदे मॅडम, मोरे मॅडम, सोन्नर मॅडम,संपत धायगुडे यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या