spot_img
1.2 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

spot_img

श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजा

धाराशिव  : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री.तुळजाभवानी देविच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.
श्री.देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर  https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सप्टेंबर २०२४ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ   https://shrituljabhavanimataseva. orgयावरून सिंहासन पुजा पास बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर  https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजेची नोंदणी करावी.
सिंहासन पुजा नोंदणी २१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू झाली आहे. ती २६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ ऑगस्ट २०२४ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.
सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० पर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील. भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.
माहे सप्टेंबर -२०२४ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.वरीलप्रमाणे भाविकांनी सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री.तुळजाभवानी मंदिर प्रशासन, तुळजापूर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या