spot_img
4.1 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img

सुंदर अशा उपक्रमाचे आयोजन करतात बाळासाहेबांना दिव्यांग कसे म्हणावे-कोंडाजी आव्हाड यांचे प्रतिपादन

समाज रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
नाशिक | ज्ञानेश्‍वर काकड
न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने १७-७-२०२४ रोजी क्रांतिवीर वंसंतराव नाईक संस्थेच्या सभागृहात वंजारी समाज रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात,उत्साहात संपन्न झाला. दरम्यान शेकडो समाज बांधव व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रीय संत भगवान बाबा व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


दिपप्रज्वलन वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, तुळशीराम महाराज गुट्टे, बाळासाहेब सानप संस्थापक जय भगवान महासंघ, अभिनेता आकाश खेडकर, दामोदर मानकर, माधुरी ताई पालवे, बाळासाहेब घुगे यांनी केले. दरम्यान समाज रत्न पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावरून कोंडाजी मामा आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले कि बाळासाहेब यांना दिव्यांग म्हणावे तरी कसं, समाज एकत्र आणायचे काम ते अशा कार्यक्रमाद्वारे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे सोपे नाही जे आपणाला जमत नाही ते स्वतः धडपडी न करतात, याावेळी महादेव जानकर यांनी बाळासाहेब घुगे यांनी आज जो पुरस्कार कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांचे आभार, असाच समाज एकत्र आणत जा, प्रत्येक क्षेत्रामध्ये वंजारी समाजाने उच्च पदावर बसावं जिद्द ठेवावी अशी माझी इच्छा आहे.बाळासाहेब दिव्यांग असूनही आज त्यांनी कार्यक्रम घडवून आणला. त्यांच्या कार्याला माझा सलाम, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब हे हिरा पारखी होते त्यांनीच मला घडवलं अशी भावनिकपणे त्यांनी व्यासपीठावरून कबुली दिली. बाळासाहेब सानप यांनी मनोगत व्यक्त केले,माधुरी ताई आपल्या मनोगतात म्हणाल्या की बाळासाहेब यांच्या कडे बघून ते दिव्यांग आहे असे अजिबात वाटत नाही. त्यांच्या कार्याला पाहून आज खरे आपणच अपंग असल्यासारखे आहोत ही खेदाची बाब आहे. त्यांचा आपण बोध घ्यावा असे त्या म्हणाल्या. यावेळी खालील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यामध्ये दैनिक लोकनामा चे मुख्य संपादक श्याम उगले, ज्येष्ठ उद्योगपदी राजेंद्र पानसरे, शंकरराव शेळके, नांदेड जिल्ह्यातील साप्ताहिक वंजारी पुकारचे मुख्य संपादक दत्ता जायभाये, शिवराम शेळके, डॉक्टर संतोष सानप, तुकाराम सानप, नंदा बंडु नाना भाबड संजय इलग, इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व सर्व नवनिर्वाचित क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिलीचे सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा यमुनाताई घुगे, रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अरुणाताई दरगुडे, वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे विश्वस्त नारायण काकड, उध्दव कुटे, सहादु नाना दराडे, मारुती इलग, रंगनाथ दरगुडे,सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.प्रास्तावित बाळासाहेब घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ सांगळे यांनी केले आभार संकेत तुकाराम सानप यांनी मानले. यावेळी क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय धात्रक यांना दोन मिनिटांचे मौन बाळगत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ताज्या बातम्या