spot_img
21.2 C
New York
Thursday, September 4, 2025

Buy now

spot_img

नगर रोडवरील अपघातात आष्टीचे दोन तरूण जागीच ठार

आष्टी : तालुक्यातील अंभोरा गावातील दोन युवक घोगरगाव येथे कामानिमित्त मोटार सायकलवरून जात असताना पाठीमागून येणार्‍या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. हा अपघात नगर -सोलापूर रोडवर आज (दि.८) झाला. या अपघातात राजेश बबन थोरात (वय २८) व शेखर नवनाथ मिसाळ ( वय ३४) यांचा जागीच मृत्यू झाला.
राजेश बबन थोरात यांच्या पाठीमागे वडील एक भाऊ असा परिवार आहे. तर शेखर मिसाळ यांच्या पाठीमागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या