spot_img
20.3 C
New York
Tuesday, June 16, 2026

Buy now

spot_img

कुंडलिक खांडेंचा जामीन लांबणीवर

बीड : शिवसेनेचे बडतर्फ जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यामध्ये उच्च न्यायालयाच्या पीठाने हे प्रकरण दुसर्‍या पीठाकडे घेऊन जाण्यास सांगितले असून सध्या तरी कुंडलिक खांडे यांचा जामीन लांबणीवर पडला आहे.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्‍वर खांडे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणात शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात कुंडलिक खांदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. कुंडलिक खांडे यांचा जामीन अर्ज बीडच्या जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. न्या. एस. जी. मेहरे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु झाली होती. मागच्या तारखेत सरकारी वकिल अमरजितसिंग गिरासे युक्तिवादासाठी वेळ मागून घेतला होता. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 8 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली होती. आज या प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर याच गुन्ह्याशी संबंधित एका आरोपीच्या अटकपूर्व जमिनीचे प्रकरण न्या. शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुरु असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. काही महिन्यापूर्वीच उच्च न्यायालयातील कामकाजाच्या संदर्भाने काही निर्देश तयार करण्यात आले असून त्यात एखाद्या गुन्ह्यातील एखादे प्रकरण अगओड्र ज्या न्यायालयासमोर सुरु आहे, त्या गुन्ह्याशी संबंधित इतर प्रकरणे देखील त्याच न्यायालयाने ऐकावीत असे निश्‍चित करण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणी दरम्यान न्या. एस. जी. मेहरे यांनी याचिकाकर्त्याच्या वकिलांना या प्रकरणात न्या. शिवकुमार डिगे यांच्या बेंचसमोर जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता कुंडलिक खांडे यांच्या जमीन अर्जावरील सुनावणीला आणखी वेळ लागणार आहे. सध्या तरी खांदे यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे.

ताज्या बातम्या