spot_img
13.6 C
New York
Thursday, October 30, 2025

Buy now

spot_img

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे हात-पाय,तोंड बांधले बांधून शाळेच्या टेरेसवर सोडले

नगर : अहमदनगरमधील एका शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचे हात-पाय आणि तोंड बांधून तिला शाळेच्या टेरेसवर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदनगरपासून जवळच असलेल्या पिंपळगाव उज्जैनी येथील शाळेत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सोमवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीचे तोंड दाबून तिला शाळेच्या टेरेसवर नेऊन तिचे हात, पाय आणि तोंड बांधून ठेवले. साडेपाच वाजता टेरेसवरून आवाज येत असल्याने गावातील काही ग्रामस्थ शाळेच्या टेरेसवर गेले. त्यावेळी त्यांना ही मुलगी हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या मुलीला सोडवतानाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. याबाबत अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात त्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस तापसानंतरच हा नेमका काय प्रकार आहे हे समोर येईल.

ताज्या बातम्या