मराठा आरक्षणचा वाद
धाराशिव :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्याच्या दौर्यावर जात असताना आरक्षणाबाबत टिप्पणी केल्यानंतर मराठा आंदोलक त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागत होते. मात्र, राज ठाकरे यांनी वेळ नाकारल्यानंतर मराठा आंदोलक थेट हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज ठाकरे स्वत: हॉटेल बाहेर आले. तुम्हाला भेटतो म्हणाले. मात्र, अद्याप धाराशिवमध्ये राज ठाकरे आणि मराठा समाजातील वादावर कोणताही तोडगा निघालेला नाही. पाच आंदोलकांना राज ठाकरेंच्या भेटीसाठी नेण्यासाठी पोलिसांची तयारी आहे. मात्र आंदोलक मीडियाला सोबत नेण्याची मागणीवर ठाम आहेत. यावेळी पोलिसांनी मीडियाच्या काही प्रतिनिधीना धक्काबुक्की देखील केली आहे.
धाराशिव शहरात राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल समोर मराठा बांधवाचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. अशातच धाराशिवच्या भूम तालुक्यातील ईट गावात राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांच्या सह भाजपच्या विविध नेत्यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आले आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिरले आहेत. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची रितसर वेळ मागितली होती. वेळ मागितल्यानंतर राज ठाकरेंनी वेळ नाकारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात गोंधळ उडालेला आहे. मनसैनिक कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. राज ठाकरे काही वेळापूर्वी या हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.