जालना : राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सरकारला थोडी सुध्दा उसंत द्यायची नाही का? असा सवाल मनोज जरांगे पाटलाांना उपस्थित करत कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आमच्या मनात उपोषणाबद्दल काही तरी वेगळं आहे का याबाबत शंका येत आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे आणि सगे सोयर्या बाबत सरकारने त्वरित निर्णय घ्यावा साठी गेल्या तीन दिवसांपासून अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अहमदनगरमधील पारनेर येथून प्रतिक्रीया दिली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरु केले असून 7 ऑगस्टपासून ते पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅली काढण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ द्यायला हवा आतापर्यंतच्या आकड्यांवरून मराठा बांधवांना 80% आरक्षण मिळाले आहे 20% साठी सरकारला थोडीही उसंत मिळू नये म्हणून हा प्रयत्न सुरू आहे का ? असा असावा उपस्थित केला आहे. या मागे काही वेगळं काही आहे का याची शंका ही आमच्या मनात उपस्थित होत असल्याचं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.