माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या मागणीची दखल
बीड : जिल्हा परिषद अंतर्गत पद भरतीपुर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांमधुन विषय शिक्षकांच्या रिक्त पदावर तातडीने नियुक्त्या करण्याचे आदेश शिक्षण संचालक प्राथमिक विभाग यांनी दिले असुन या जागा भरण्यात याव्यात यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेवून रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. माजी मंत्री क्षीरसागर यांनी शिक्षण संचालक यांना तातडीने पाठपुरावा करून बीड जिल्हा परिषद अंतर्गत रिक्त पदावर नियुक्त्या कराव्यात अशी मागणी केली होती.त्यानुसार आता या जागा भरण्याची प्रक्रिया होणार आहे.
बीड जिल्ह्यात जळवपास 450 विषय शिक्षक ज्यात गणित,विज्ञानची रिक्त पदे आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सन 2014 पासून प्राथमिक पदवीधर पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. परिणामी ग्रामीण भागात उच्च प्राथमिक शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.ही बाब संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि पदाधिकारी यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेवून ही बाब निदर्शनास आणून दिली. शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्याशी तातडीने संपर्क साधून मंजी मंत्री क्षीरसागर यांनी बीड जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देण्याची विनंती केली. त्यानुसार शिक्षण संचालक यांनी जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपुर्वी कार्यरत असलेल्या शिक्षकांमधुन विज्ञान व गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी रिक्त पदांच्या मर्यादेत सेवाजेष्ठता शिक्षकांमधुन गुणवत्तेनुसार इयत्ता 6 वी,7 वी,8 वी करीता विषय शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.