वृद्ध महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली. हा तरुण महिलेवर बलात्काराच्या उद्देशाने अंधारात तिचा पाठलाग करत होता. महिलेने या तरुणाला विरोध केला तर त्याने तिची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केली. हत्यानंतर त्याने मृतदेह झाडाझुडपात नेला आणि त्याठिकाणी महिलेच्या मृदेहावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेत बेड्या ठोकल्या.
आरोपी तरुणाने याआधी देखील असं भयंकर कृत्य केले होते. त्याने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी तो गुजरातच्या भरूचवरून दिल्लीत आला होता. तेव्हा त्याने दिल्लीमध्ये एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यामुळे त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. या प्रकरणी महेंद्रा पार्क पोलिसांनी २४ वर्षीय सलमानला गुजरातमधून अटक केली.
१६ नोव्हेंबरला महेंद्रा पार्क पोलिसांना आदर्श नगर रेल्वे स्टेशनजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली होती. एक वृद्ध महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिच्या शरीरावर कपडे नव्हते. घटनास्थळी हत्या केलेले शस्त्र आणि फाटलेले कपडे पडलेले होते. मृतदेह ज्या अवस्थेत होता त्यावरून महिलेवर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आणि त्या अनुषंघाने तपास सुरू केला.
हत्या करण्यात आलेली महिला होलंबी कला येथे राहणारी होती. तिने घर विकून टाकले होते. ती आदर्श नगर रेल्वे स्टेशन परिसरातच रात्री झोपायची. १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही महिला रेल्वे स्टेशन परिसरातील एका रस्त्यावरून जात होती. त्याचवेळी आरोपीने तिचा पाठलाग केला. आरोपीने महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केल्यामुळे त्याने तिची हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे गुजरातमधून आरोपीला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

