spot_img
28.3 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img

बडोदा बँकेच्या मॅनेजरची आत्महत्या

बारामती: बारामतीतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बँकेच्या मॅनेजरने बँकेतच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना बारामतीमध्ये घडली आहे. बारामतीमध्ये बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बारामतीमधील भिगवण रोडवरील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिवशंकर मित्रा असे मॅनेजरचे नाव आहे. मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी देखील लिहली आहे. बँकेच्या दबावामुळे मी आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये मित्रा यांनी म्हटलं आहे.
मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शिवशंकर मित्रा यांनी म्हटलंय, मी शिवशंकर मित्रा, बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक बारामती, मी आज बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहे, माझं बँकेला आवाहन आहे की, कर्मचार्‍यांवर इतका दबाव टाकू नये. सर्वांना आपल्या जबाबादार्‍यांची जाणीव आहे, प्रत्येक जण आपलं १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतोय. मी पुर्णपणे जाणीवपूर्वक माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या कुटुंबाची यात कोणतीही जबाबदारी नाही. बँकेच्या प्रचंड दबावामुळे मी हे करत आहे. बायको प्रिया, मला माफ करा, माही माझी मुलगी, मला माफ कर. शक्य असल्यास, कृपया माझे दोन्ही डोळे दान करा, असं शिवशंकर मित्रा यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर मित्रा हे मूळ उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील आहेत, ते गेली अनेक वर्ष बँक ऑफ बडोदाच्या शाखा व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी मोठा दबाव असल्याने गेल्या काही दिवसांपासून शिवशंकर मित्र तणावाखाली होते. त्यांनी या संदर्भात घरच्यांशी चर्चा केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पाच-सहा दिवसापूर्वीच त्यांनी बँकेकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला होता, मात्र त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना ही नोकरी सोडायची होती, ते अनेक दिवस वरिष्ठांना अतिरिक्त दबाव टाकू नका असे म्हणत होते, मात्र कोणीच ऐकले नाही. त्यामुळे काल रात्री उशिरा त्यांनी सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. यामध्ये त्यांनी बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आपण आत्महत्या करत आहोत असे स्पष्ट केले आहे.
भिगवण रस्त्यावरील ’बँक ऑफ बडोदा’ बँकेच्या शाखेत काल (गुरुवारी) शिवशंकर मित्रा यांनी रात्री उशिरा आपलं जीवन संपवलं. बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केला आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वजण भावूक झाले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यासोबत काम करणार्‍यांवर दबाव टाकू नका असंही म्हटलं आहे.

ताज्या बातम्या