spot_img
11.7 C
New York
Sunday, October 26, 2025

Buy now

spot_img

प्रसाद दिघोळेची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड

सिन्नर : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथिल प्रसाद दत्तात्रय दिघोळे याची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड झाली.
भारतीय महासंघाच्या निदर्शनुसार दिनांक २८ जून ते १ जुलै २०२५ या कालावधीत हरिद्वार (उत्तराखंड) येथे संपन्न होणार्‍या १८ वर्षाखालील मुलांच्या पहिल्या राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.टाळगाव चिखली ( पुणे ) येथिल ओम साई कबड्डी संघाचा खेळाडू आहे.नुकत्याच पुणे येथिल बालेवाडी क्रिडा संकुलात झालेल्या विभागीय स्पर्धेत दिघोळे याने पिंप्री चिंचवड संघाचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेत संघाने तिसरा क्रमांक पटकावत प्रसादने चमकदार कामगिरी केली होती.
सराव शिबीरा नंतर रविवारी ( दि.२२ ) रोजी महाराष्ट्र राज्य संघाची निवड प्रक्रिया पार यात प्रसाद ला महाराष्ट्र संघात स्थान मिळाले आहे.आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रविण नेवाळे तसेच शुभम नेवाळे व ब्राम्हणवाडे येथिल प्रशिक्षक आवेज शेख यांचे मार्गदर्शन लाभले आहे.त्याच्या या निवडीचे नायगाव खो-यात स्वागत होत आहे.

ताज्या बातम्या