spot_img
20.4 C
New York
Monday, September 15, 2025

Buy now

spot_img

कारच्या धडकेत माजी उपसभातीचा जागीच मृत्यू

केज : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील केज पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण कुंडलिक घुले वय (७५ वर्ष) यांचा डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावरील मधुबन हॉटेल जवळ मंगळवारी दि. ३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली.
टाकळी ता. केज येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती नारायण कुंडलिक घुले वय (७५ वर्ष) हे मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या परिसरातील त्यांच्या घराहून दुचाकीवर शहराकडे निघाले होते. त्यांची दुचाकी ही केज – मांजरसुंबा रस्त्यावर आली असता मांजरसुंब्याकडून भरधाव वेगात आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या झालेल्या अपघातात दुचाकीवरील नारायण घुले यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कार चालक कारसह फरार झाला असून कारचा नंबर शोधण्यात पोलिसांना यश आले असल्याचे समजते.
दरम्यान माजी उपसभापती नारायण घुले मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला असून बुधवारी सकाळी ११:०० वा. शवविच्छेदन झाल्या नंतर त्यांच्या पार्थिवावर टाकळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ताज्या बातम्या