मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याशिवाय पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज देण्याची मागणीही पंकजा मुंडे यांनी केली आहे. मी मंत्री झाल्यावरच धस यांना बीडमधील गुन्हेगारी दिसू लागली का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. ’सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या बोलत होत्या. १५ मार्च रोजी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. संतोष देशमुख प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्येचाही पंकजा मुंडे यांनी सांगितलेय.
तीन वर्षांपासून राज्यात महायुतीचे सरकार आहे. धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री होते, सुरेश धस आमदार होते. त्यावेळी वाल्मीक कराड काम करत होता. त्यावेळी धस यांनी याबाबत तिन्ही नेत्यांकडे तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यावरच धस यांना बीडमधील गुन्हेगारी वाढल्याचे दिसू लागले का? असा सवाल पंकजा मुडे यांनी उपस्थित केला. सुरेश धस हे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरतात,त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट गुपचूप का घेतली? या भेटीविषयी पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.