spot_img
8.1 C
New York
Sunday, March 16, 2025

Buy now

spot_img

श्री राम लीला एज्युकेशन सोसायटीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात


नाशिक | प्रतिनिधी
नाशिक मध्ये श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध संस्कृती कार्यक्रमाला संपन्न झाले. बाल गोपाला ने शिवरायांची वेशभूषा केली. मुलींनी राजमाता जिजाऊंची वेशभूषा केली व इतर बालगोपाला मावळे बनले. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणवर्णन केले. पोवाडे, गीत तसेच महिलांनी पाळणा अशी विविध संस्कृती कार्यक्रमाचे आयोजन करून दिन साजरा करण्यात आला.
श्रीरामलीला एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतीदार अठरा पगड समाज ज्याप्रमाणे घडवला त्याचप्रमाणे आज आपल्याला बारा बलुती दारा प्रमाणेच समाजाची गरज आहे. माननीय पंतप्रधान म्हणतात ’मेक इन इंडिया ’म्हणजे भारताने उत्पादन तयार करा आणि भारतात विका जेणेकरून आपला पैसा बाहेरच्या देशात जाणार नाही आणि हीच संकल्पना आपल्या राजांनी चारशे वर्षांपूर्वी स्वतःच्या राज्य कारभारात राज्यात हीच संकल्पना अमलात आणली आणि तिलाच आपण बारा बलुतेदार म्हणत . सर्वांना एकमेकांची गरज लागेल त्यामुळे सामाजिक, आर्थिक ,मानसिक, व शत्रूशी लढण्याची एकजूट ताकद निर्माण होईल. शत्रु वर विजय मिळवणं सोपं होईल. आणि त्याच फळ एक मजबूत समाज तयार झाला होता अशा मजबूत समाज एकत्र राहिल्यामुळे शत्रूला हरवलं सोपं जातं हे त्यामागचं फलित आपण सर्वांनी बघितला आहे. नाहीतर आज आपण कदाचित हा सोहळा साजरा केला नसता कदाचित आपण हिंदू म्हणून गर्वाने मिरवलं नसतो आणि म्हणून अख्या विश्वात राजांचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे प्रगत म्हणणार्‍या देशांनी सुद्धा महाराजांच्या सामाजिक, राजकीय ,युद्धनीती. अर्थनीती या सर्वांचा उच्च शिक्षणात समावेश करून राजांच्या नीतीचा अभ्यास करत आहे .एवढ्या मोठ्या सन्मानाने माझ्या राजांचं विश्वात कौतुक होतं .आज यानिमित्ताने उर भरून आला आहे .आणि ’गर्व से कहो हम हिंदू है ’हे आज मी केवळ माझ्या राजांमुळेच म्हणू शकतो कारण त्याचं मूळ हे माझ्या राजांच्या आठवणीनेच पूर्ण होतात राजे नसते तर मी हिंदू नसतो. या निमित्ताने मी राजांना त्रिवार नमन करतो, मुजरा घालतो ,जय भवानी जय शिवाजी. हा नारा म्हणतांना मी माझी छाती गर्वाने फुगते आणि आठवण होते ते माझ्या राजमाता जिजाऊ मातेचा त्यांनी आज मला असे बलाढ्य, शूरवीर, युद्धनीती, तज्ञ, अर्थ, सामाजिक, राजकीय तज्ञ, जन्माला घालून या राज्याचे रक्षण केलं आणि या विश्वाचा एक विश्वगुरू म्हणून आज नावलौकिक मिळवून दिलेला आहे ,ही सर्व शिकवण जिजाऊ मातेची आहे त्यांनाही मी त्रिवार नमन करतो.
संस्थेचे अध्यक्ष सौ अरुणा दरगुडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना आज महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यामध्ये हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सोहळ् घरोघरी साजरा होत आहे. त्याचबरोबर एक आठवण ठेवली पाहिजे आपला महाराष्ट्र राजांच्या विचारांचा असला पाहिजे. आई, बहिणींची इज्जत वाचली पाहिजे, धर्मनिष्ठता परंपरा जपली पाहिजेत. धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे राजांनी सर्व धर्म समभाव पाळला आहे. आज जातीपातीत बाटल्या जात आहे. महाराष्ट्राची दैनी अवस्था करून ठेवलेली आहे खरंच आज राजे असते तर ढसाढसा रडले असते असा महाराष्ट्र मी तुम्हाला दिलेला नव्हता. आजची महाराष्ट्राची अवस्था बघून महाराजांना खूप वाईट वाटले असते. सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे ज्याप्रमाणे राजमाता जिजाऊ ने आपले राजांना आज एवढं नावलौकिक मिळवून दिला तशी शिकवण दिली त्याचप्रमाणे सर्व माता-भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे आपल्या मुलांना देखील आपण आई बहिणीचा सन्मान करायला शिकवला पाहिजे मुलींनी देखील सावध राहिला पाहिजे. कोणाच्याही सांगण्यावरून आपला धर्म सोडणं आपले आई-वडील सोडणं अशी जे प्रकार वाढले आहे ते केवळ मुलींनी स्वतःची हिम्मत ओळखली नाही म्हणून. स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. समाजात वावरताना सामाजिक बांधिलकी ,नीतिमत्ता जोपासली पाहिजेत त्याचप्रमाणे स्वतः गाफील राहायचं नाही सध्याच्या सामाजिक बदलाला ओळखून आपण समाजात वावरले पाहिजे. मुलींना संरक्षणाचे ,स्वाभिमानाचे व शौर्याचे भान ठेवून वागले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याच आयोजन संस्थेचे सल्लागार व कार्याध्यक्ष चैतन्य दरगुडे यांनी या कार्यक्रमास उपस्थित श्री थोरमीसे श्री पगार श्री पाटील श्री बेडसकर हितेश पाटील रोहन सानप कुणाल पवार शुभम सानप, शुभम आयुष थोरमिशे, साई गवळी कुणाल विवान संस्थेचे अध्यक्ष सौ अरुणा दरगुडे , सुभद्रा जी पाटील , काकड आजी प्रतिभा पाटील ,शुभांगी पाटील , आरसीन, भाभीजी, श्रद्धा पडवी, गवळी ताई , पवार ताई, बेडसकर , थोरमीसे ताई, पाटील ताई व इतर सर्व बालगोपाल आणि समाज बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या